• Sun. Sep 13th, 2026

Ganeshotsav 2026: पेणच्या 15 लाख गणेशमूर्ती यंदा विदेशात; समुद्र, हवाईमार्गे प्रवास, काळजीपूर्वक पॅकिंग

Ganeshotsav 2026: पेणमधील गणेशमूर्तींना विदेशातून मोठी मागणी आहे. यंदा १५ लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लगबग वाढली आहे. पेणमध्ये तयार होणाऱ्या रेखीव आणि आकर्षक गणेशमूर्तींना देशाबरोबरच विदेशातूनही मोठी मागणी असून, यंदा सुमारे पंधरा लाख मूर्ती परदेशात रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

पेणच्या गणेशमूर्तींचे बोलके डोळे, सुबक मुख, आकर्षक रंगसंगती आणि कलात्मकता यामुळे त्यांना जगभरातील गणेशभक्तांकडून पसंती मिळते. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिरातीसह विविध देशांमध्ये राहणारे भारतीय नागरिक, तसेच स्थानिक गणेशमंडळांकडून पेणच्या मूर्तींची मागणी वाढत आहे. परदेशात मूर्ती पाठविण्याचे नियोजन अनेक महिने आधीपासून केले जाते. मोठ्या संख्येने मूर्ती समुद्रमार्गे कंटेनरमधून पाठविल्या जातात, तर तातडीच्या मागणीनुसार हवाई वाहतुकीचाही वापर केला जातो. प्रवासात मूर्तींचे नुकसान होऊ नये, यासाठी काळजीपूर्वक पॅकिंग केले जाते.

Maharashtra TimesMaharashtra Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे! राज्यात वादळी पावसासह विजांचा कडकडाट, IMDचा अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’पेणमधील गणेशमूर्ती उद्योगाला यंदा चांगलीच चालना मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पेणमध्ये सत्तर लाखांहून अधिक गणेशमूर्तींची विक्री झाली असून, कच्च्या मालाच्या वाढलेल्या दरामुळे मूर्तींच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही मागणी कायम आहे.

महिलांचा वाढता सहभाग

मूर्ती साकारण्यापासून रंगकाम, डोळ्यांची आखणी, कलाकुसर आणि वस्त्रालंकारापर्यंतच्या कामात पेणमधील महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती उद्योगातून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागत आहे. शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.

Ajay Baraskar On Manoj Jarange Patil | जरांगेंच्या मुंबई मोर्चाआधी बारस्करांकडून मोठं आव्हान

गणेशोत्सवाला पर्यावरणस्नेही आकार

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा वसा घेत गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा विचार सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी संयुक्त विद्यमाने ‘टाइम्स ग्रीन गणेश’ या उपक्रमांतर्गत अनोख्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा