• Sun. Sep 13th, 2026

Manoj Jarange Chalo Mumbai: मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा; मराठा आरक्षणासाठी 19 सप्टेंबरपासून आंदोलन, कुठे-कुठे मुक्काम?

मुंबई : उपोषण थांबणार नाही. मुंबईत आझाद मैदानावर १९ सप्टेंबरपासून आंदोलन होणार असून, त्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून निघणार आहोत, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केली. आम्हाला अडवले, तर सरकार पडले म्हणून समजा, असा इशाराही जरांगे यांनी दिला. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांच्या बैठकीत ते बोलत होते.

सरकारला आणखी काही दिवस संधी उपलब्ध आहे. मुख्यमंत्री‌ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत यावे, अथवा आम्ही मुंबईला निघाल्यानंतर आझाद मैदानापर्यंत कुठेही रस्त्यात यावे. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली आहे, असे समाजाला सांगावे, असे सांगून जरांगे यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासाचे वेळापत्रक जाहीर केले.

Mumbai Crime: मुंबईत फुकट्या प्रवाशाचा टीसीवर हल्ला; भुवईखाली सात टाके, डोळा थोडक्यात बचावला, आरोपी अटकेतमुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन मराठा समाजाच्या महिला त्यांना सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू लावून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणार आहेत, असेही सांगण्यात आले. सहकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयानच्या नोटिसा बजावल्याचे सांगत जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

प्रवासटप्पे असे…
१५ सप्टेंबर रोजी पाटोदा (जि. बीड) येथे पहिला मुक्काम, १६ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे दुसरा मुक्काम, १७ सप्टेंबर रोजी हडपसर (जि. पुणे) येथे तिसरा, १८ सप्टेंबर रोजी खोपोली (जि. रायगड) येथे चौथा मुक्काम आणि १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

Gunratna Sadavarte | जरांगेंची चलो मुंबईच घोषणा, सदावर्तेंची टीका, मराठ्यांचा मोर्चा रोखणार?

हाके आणि मराठा युवकांमध्ये झटापट

सोलापूर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सोलापूर पुणे महामार्गावरील पाकणी फाटा येथे एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना दोघा कार्यकर्त्यांकडून जाब विचारून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्यावर मोठा हल्ला करण्याचा डाव होता, मात्र आपण त्यातून वाचलो असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. अशातच या मुद्याला आता हिंसक वळण लागत आहे. हाके यांच्याशी काही तरुणांनी वाद घातल्यानंतर त्यांच्यात झटापट झाली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके हे त्यांच्या गावी परतले .

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed