Manoj Jarange Chalo Mumbai : मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा; मराठा आरक्षणासाठी 19 सप्टेंबरपासून आंदोलन, कुठे-कुठे मुक्काम?
उपोषण थांबणार नाही. मुंबईत आझाद मैदानावर १९ सप्टेंबरपासून आंदोलन होणार असून, त्यासाठी १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून निघणार आहोत, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केली. आम्हाला अडवले, तर सरकार पडले म्हणून समजा, असा इशाराही जरांगे यांनी दिला. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांच्या बैठकीत ते बोलत होते.