• Fri. Sep 11th, 2026

Nitin Gadkari on Mumbai Goa Highway : इतका उशीर झाल्याची मला लाज वाटते, त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटनाला आता मी येणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, गोवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा गेली काही वर्षं चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गाचे काम गेले 16 ते 17 वर्षे रडतखडत सुरु आहे, या महामार्गाला खूप वेळ लागला हे माझं दुर्भाग्य आहे, अशी खंत व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदार-अधिकारी यांच्याविषयी जाहीरपणे नाराजी मांडली आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. एवढंच नाही, तर इतका उशीर झाल्याची मला लाज वाटते, त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटनाला आता मी येणार नाही, असे यापूर्वीच जाहीर केले होते, त्याचा पुनरुच्चार नितीन गडकरी यांनी केला आहे.

गोव्यातील पर्वरी येथील ६-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (उन्नत मार्ग) उद्घाटनात सहभागी होताना आनंद होत आहे. ६४१.४६ कोटी रुपये मंजूर खर्चातून उभारण्यात आलेल्या ५.१५ किमी लांबीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दिगंबर कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra TimesAmey Ghole : अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू, शिवसेना नेत्याचा भाजपला इशारा; शिंदेंनी सुरु केलेल्या योजनेत घोटाळ्याचे आरोप

कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा

गडकरी पुढे म्हणाले की, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी बराच उशीर झाला यात माझी चूक नाही. अनेक कॉन्ट्रॅक्टर फेल झाले. माझ्या डिपार्टमेंटचे जगात सात वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, पण मला आता आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहेस जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅक लिस्टेड करणं आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड करणं आणि यामुळे मी आता जाहीर केलं की मी मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनासाठी आता येणार नाही, असं म्हणत महामार्गाचे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर थेट कारवाई करण्याचाच मोठा इशारा गडकरी यांनी दिला आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम आता 90 ते 95 टक्के पूर्ण झाले आहे. या संदर्भात नुकतीच बैठक झाली. आता आपण ऑक्टोबर महिन्यात मुंबईत ते गोवा असा गाडीने प्रवास करणार आहोत. या महामार्गाचे काम कसे झाले आहे, याची पाहणी करणार आहोत, अशीही मोठी घोषणा यावेळी गडकरी यांनी गोव्यात केली आहे.

Maharashtra TimesMira Bhayandar News : पर्युषण पर्वात डब्यात कांदा-लसूण नको, मिरा रोडमधील भाजप नेत्याच्या शाळेचा विद्यार्थ्यांसाठी फतवा, मनसेचा कडाडून विरोध

माझी कर्मभूमी कार्यभूमी आहे तिथूनच उभा राहणार

नितीन गडकरी यांच्या पूर्वीच्या एका विधानावरून त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र या चर्चेला आता थेट नितीन गडकरी यांनीच पूर्णविराम दिला आहे. मला गोव्यात एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही गोव्यात इतकी कामे केली आहेत, तुम्ही गोव्यातून उभे राहणार का? तसं मला योगायोगाने अनेक राज्यातून विचारतात आणि मी उभे राहावं यासाठीही मला अनेकांनी ऑफर दिली, पण एक सांगतो, मी माझ्या कार्यभूमी व कर्मभूमीतूनच उभा राहणार, जोपर्यंत मला पार्टी संधी देईल, तोपर्यंत तिथूनच मी उभा राहणार, माझा मतदारसंघ काही मी सोडणार नाही असं म्हणत आपण पुढच्या लोकसभेला नागपूर येथूनच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. नितीन गडकरी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या या पार्श्वभूमीवरती गडकरींचे हे विधान हे महत्त्वाचे मानले जात आहे. यावेळी गडकरी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी सुचवलेल्या गोव्यातील एका मोठ्या रस्ते पूल प्रकल्पाची आठवण करून देत त्यांच्या कामाच्या स्मृतींनाही उजाळा दिला.

Maharashtra TimesAlbatya Galbatya : जादूने माझी आई मला परत कर ना.. सातव्या वर्षी माऊली गमावली; चिमुरडीच्या भाबड्या विनवणीने ‘अलबत्या गलबत्या’ची टीम निशब्दगोवा हे देशातील महत्त्वाचे राज्य असून या ठिकाणी देशातील भव्य दिव्य काम उभे राहावं यासाठी त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा एका सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पाची त्यांनी माहिती दिली व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामाचंही कौतुक गडकरी यांनी केलं.