• Fri. Sep 11th, 2026

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा सुरुच, वारसांना नोकरी देण्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांचं आश्वासन; जरांगे पाटील काय म्हणाले?

Manoj Jarange Patil Maratha Reservation Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भवन (ता. सिल्लोड) येथे छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जालना मनोज जरांगे पाटील उपोषण मराठा आरक्षण उपोषण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश देत, संबंधित कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी ही माहिती दिली.

कुटुंबांना दिलासा मिळण्याची आशा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीझालेल्या आंदोलनात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि आधार देण्याचा मुद्दा आंदोलनाच्या काळापासूनच चर्चेत आहे. आता संबंधित कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याच्या निर्णयामुळे या कुटुंबांना दिलासा मिळण्याची आशा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, डॉ. पी. एन. अनबलगन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.

Maharashtra TimesMira Bhayandar News : पर्युषण पर्वात डब्यात कांदा-लसूण नको, मिरा रोडमधील भाजप नेत्याच्या शाळेचा विद्यार्थ्यांसाठी फतवा, मनसेचा कडाडून विरोध
दरम्यान, ‘आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना आधार देण्याची जबाबदारी महायुती सरकार ठामपणे पार पाडत आहे,’ असे सामंत म्हणाले. या निर्णयातून मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदानाची दखल सरकारने घेतल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे.

‘सरकारला देणेघेण नाही’

‘मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु असलेली बैठक निष्फळ आहे. फक्त षडयंत्र सुरु आहे. हा राजकीय स्टंट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाबाबत काहीही देणेघेण नाही’, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी अंतरवाली सराटीत व्यक्त केली. दरम्यान, वैद्यकीय पथकाने जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली. ‘ते सलाइन लावून घेत आहेत’, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.

Maharashtra TimesAmey Ghole : अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू, शिवसेना नेत्याचा भाजपला इशारा; शिंदेंनी सुरु केलेल्या योजनेत घोटाळ्याचे आरोप

‘जरांगे यांनी उपोषण सोडावे’

‘प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही चार नाही, तर चार हजार पावले पुढे आलो आहोत. आता मनोज जरांगे पाटील यांनी गैरसमज दूर करून उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले. याच पत्रकार परिषदेत त्यांनी जात पडताळणीच्या संथ गतीबाबतचे दावे फेटाळले.

‘मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जसे पाठीराखे आहेत, तसे आम्ही आमच्या नेत्यांचे पाठीराखे आहोत. जर जरांगे यांच्या विरोधात बोलल्यावर त्यांच्या समर्थकांना राग येत असेल, तर आम्हालाही आमच्या नेत्यांबद्दल एकेरी बोलल्यावर वाईट वाटते’, असे सामंत व लाड यांनी नमूद केले. ‘अधिकारी प्रमाणपत्र देण्याबाबत आणि पडताळणीबाबत योग्य काम करीत आहेत. त्यामुळे जरांगे यांचा कोणी गैरसमज करून देत असेल, तर तसा गैरसमज निर्माण करून देणारी व्यवस्था त्यांनी दूर करावी’, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesSomeshwar Sugar factory: पुन्हा पवार विरुद्ध पवार; ‘सोमेश्वर’साठी सुनेत्रा पवारांच्या पॅनेलसमोर युगेंद्र पवारांचे आव्हान

कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप वेगाने

आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३,१७,५६९ अर्जांपैकी ३,१६,९७७ जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, तसेच जात पडताळीसाठी प्राप्त २१,०५१ पैकी १६, ११० प्रकरणांमध्ये प्राप्त जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा