अमरावती रुग्णालयात २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी समितीने आपला अहवाल नुकताच सरकारकडे सादर केला. समितीने रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय उपकरणांची देखभाल आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजाची तपासणी केली. व्हेंटिलेटरची आवश्यक वेळी देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Nitin Gadkari : मला लाज वाटते, मुंबई-गोवा हायवेला इतका उशीर झालाय, उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींची घोषणाया पार्श्वभूमीवर कामकाजातील हलगर्जी, बेजबाबदारपणा, पर्यवेक्षीय नियंत्रणातील त्रुटी आणि अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९मधील नियम ८नुसार शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात यात अकोला परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाघचौरे, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अमरावतीचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, स्त्री रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी; तसेच वीजतंत्री यांचा समावेश आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकणार
रुग्णालयातील कामकाजाशी संबंधित कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिलार कंपनीच्या सेवांमध्येही प्रथमदर्शनी दोष आढळल्याने फॉरेन्सिक अहवाल तातडीने प्राप्त करून पुढील कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. दोष सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
‘त्या’ देवदूतांचा होणार सन्मान
दुर्घटनेच्या वेळी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरलेले असताना, स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता ३६ नवजात बालकांना तातडीने सुरक्षित बाहेर काढून अन्य रुग्णालयांमध्ये हलवणाऱ्या तत्पर रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या धैर्याचे सरकारने विशेष कौतुक केले. स्वत:चा जीव धोक्यात घालून बालकांचे प्राण वाचवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासनस्तरावर गौरवण्यात येणार आहे.
Someshwar Sugar factory: पुन्हा पवार विरुद्ध पवार; ‘सोमेश्वर’साठी सुनेत्रा पवारांच्या पॅनेलसमोर युगेंद्र पवारांचे आव्हानराज्यभर रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट
अमरावती दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेकडेही लक्ष देण्यात आले आहे. एसएनसीयू आणि एनआयसीयूमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबरोबरच सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा मॉकड्रिल अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांची देखभाल यासाठी मानक कार्यपद्धती काटेकोर लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांचे विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांतील फायर ऑडिटची अंमलबजावणी आणि त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी निश्चित करण्यासही सांगण्यात आले आहे.
