• Fri. Sep 11th, 2026

Rohit Pawar: राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: विदर्भासह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी केली. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख उपस्थित होते.

शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातील परिस्थितीही गंभीर असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत पावसाची कमतरता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही ३० ते ६० टक्क्यांपर्यंत पावसाची तूट असल्याचे त्यांनी नमूद केले.

Maharashtra TimesNagpur Marbat Festival: कॉक्रोच, मुनीर, महागाईला घेऊन जा रे बडग्या…; नागपुरात आज ऐतिहासिक मारबत-बडग्या महोत्सवपावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत आला असून, आगामी रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विलंब न करता दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांसोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांनाही मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

‘राजकीय खेळ’ पार्थ

पवारांना कळेल

पार्थ पवार आणि भाजप आमदार परिणय फुके यांच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. ‘पार्थ पवारांना आता भाजपचा राजकीय खेळ समजेल. मित्रपक्षातील नेत्यांनाही भाजप कसे अडचणीत आणते, हे पुढे स्पष्ट होईल,’ असा टोला त्यांनी लगावला. देवरी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कथित गैरव्यवहारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?एमपीएससी परीक्षा का पुढे ढकलली?

२३ सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरही पवार यांनी संशय व्यक्त केला. एफडीए पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला का, हे स्पष्ट व्हावे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी पेपरफुटीच्या प्रकरणांची कठोर चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा