• Fri. Sep 11th, 2026

Nagpur Marbat Festival 2026: शहरातील विविध मारबत व बडग्या उत्सव मंडळांनी मिरवणुकीतील मुख्य विषय आणि संकल्पना जाहीर केल्या आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ऐतिहासिक मारबत आणि बडग्या महोत्सव आज, शुक्रवारी होणार आहे. या निमित्ताने जुन्या शहरातील वस्त्यांमधून मिरवणुका निघणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मुद्द्यांवर प्रहार करणारे बडगे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर, महागाई, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आदी विषयांचा समावेश आहे.

अनिष्ट रूढी-परंपरा, महागाई, गुन्हेगारी आणि राजकीय घडामोडींवर प्रहार करणारा हा सोहळा यंदाही ज्वलंत विषयांवर भाष्य करणार आहे.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?भालदारपुऱ्यातील अविघ्न बडग्या उत्सव मंडळाने अध्यक्ष सोमू बिराह यांच्या मार्गदर्शनात महापालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडणारा बडग्या साकारला आहे. मस्कासाथ येथील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांच्यावर टीका करणारा बडग्या तयार केला आहे. त्यावर ‘फेल्ड मार्शल’, ‘फेल कमाल, बलूचिस्तान में बुरा हाल’ अशा उपरोधिक घोषणा असणार आहेत.

चकना चौकातील भारतीय जनता पार्टी बडग्या उत्सव समितीतर्फे अध्यक्ष सचिन थापे यांच्या नेतृत्वात राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा बडग्या निघणार आहे. यात ‘कॉक्रोच जनता पार्टीला घेऊन जा गे बडग्या’ आणि ‘सावजीचा अपमान करणाऱ्या मुंडेला घेऊन जा रे बडग्या’ अशा घोषणांचा मारा केला जाणार असल्याची माहिती आहे.

पंचकुआँतील संग्राम बडग्या उत्सव मंडळ तसेच युवा शक्ती बडग्या उत्सव समितीने वाढत्या महागाईविरुद्ध रोष व्यक्त करणारा बडग्या काढण्याचे ठरविले आहे. विजय पराते यांच्या नेतृत्वात युवा शक्ती बडग्या उत्सव समिती गेल्या चाळीस वर्षांपासून बडग्या काढत आहे.

बाळाभाऊ पेठ परिसरातील चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेला बाल बडग्या उत्तर नागपूर भागात फिरवला जाणार आहे. हा बडग्या मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता स्थानिक परिसरातच फिरणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

परिणय फुकेंचे आरोप, Rohit Pawar भडकले, माझी काळजी करू नये म्हणत आतली बातमी फोडली

मेरठ हत्याकांड मांडणार पांढरी मारबत

भालदारपुरा येथील एकता मारबत उत्सव मंडळाद्वारे अध्यक्ष विजय मतेलकर यांच्या नेतृत्वात विशेष पांढरी मारबत काढली जाणार आहे. मार्च २०२५मध्ये मेरठ येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने मर्चंट नेव्हीतील पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या ड्रममध्ये लपविल्याची घटना घडली होती. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध या मारबतीद्वारे नोंदविला जाणार आहे.

चार हजार पोलिसांचा ताफा
मारबत उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली आहे. शुक्रवारी निघणाऱ्या मिरवणुकीसाठी पोलिस हाय अलर्टवर असून, सेक्टरनुसार सुमारे चार हजार पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना थेट पोलिस कोठडीत डांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी तीन अपर पोलिस आयुक्त, सात उपायुक्त, १४ सहायक आयुक्त, ५५ निरीक्षक, ३५० सहायक निरीक्षक, एसआरपीएफची तुकडी व सुमारे हजार होमगार्ड तैनात असतील. मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा