• Fri. Sep 11th, 2026

Maharashtra Rain Alert: पुढील चार दिवस पावसाचे! राज्यात वादळी पावसासह विजांचा कडकडाट, IMDचा अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई : राज्यातील काही भागांत पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान विविध जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून, काही जिल्ह्यांना ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे.

११ सप्टेंबरला नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैदधुळे, नाशिक घाट व नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

१३ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. १४ सप्टेंबरला नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असून, या भागांसाठीही ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Timesऊसगाळप 15 ऑक्टोबरपासून; मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णयविजांचा कडकडाट; खबरदारीचे आवाहन
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे. झाडे, विजेचे खांब किंवा इतर धोकादायक ठिकाणी आसरा घेणे टाळावे; तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या भागात अलर्ट?

  • नाशिक घाट परिसर
  • परभणी
  • वर्धा
  • हिंगोली
  • चंद्रपूर
  • नांदेड
  • गोंदिया
  • यवतमाळ
  • गडचिरोली
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *