Navi Mumbai Woman Death : प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने आपले रंग दाखवले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पत्नीचा अकाली अंत झाल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरात उघडकीस आली आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, नवी मुंबई : प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने नवविवाहित पत्नीला केलेल्या कथित जीवघेण्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. सायली लोखंडे असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पती सागर कदम याला अटक केली आहे. सागरने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायलीने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
पळून जाऊन प्रेम विवाह
नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या सायली लोखंडे हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या सागर कदम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ५ जून रोजी सायली नेहमीप्रमाणे कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती सागरसोबत निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. दोघांनी लग्न केल्याचेही समोर आले. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत सायली रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली.
पतीविरोधात पोलिसात गुन्हा
सायलीला झालेल्या गंभीर दुखापतींची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी सागर कदम याच्याविरोधात मारहाणीची तक्रार रबाळे पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, सायलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल दोन महिने ती मृत्यूशी झुंज देत होती.
अखेर उपचारादरम्यान सायलीचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवून आरोपी सागर कदम याला अटक केली. प्रेमसंबंधातून सुरू झालेला संसार लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देऊन सायलीचा अखेर मृत्यू झाला.
Anurag Upadhyay : कॉर्पोरेटची संधी सोडून लष्करात, कर्नल अनुराग उपाध्याय स्ट्रोकनंतर मदतीच्या प्रतिक्षेत, मज्जासंस्थेवर मोठा आघात
मैत्रिणीशी बोलल्याचं निमित्त
फक्त मैत्रिणीचा फोन आला म्हणून नवऱ्यानं जबर मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी डोळ्यावर, पोटावर, तोंडावर मारहाण केली असल्याचे सायलीने तक्रारीत नमूद केल्याची माहिती आहे. मारहाणीमुळे सायलीच्या पोटातील नाजूक अवयवांना गंभीर इजा झाली. सायलीची प्रकृती आधिकच खालवल्याने तिला चेंबूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्रा तीन महिन्यांच्या उपचाराअंती तिचा श्वास थांबला. या घटनेने घणसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रबाळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा