आरक्षण उपवर्गीकरणाचा मोठा मोर्चा बुधवारी सोलापुरात संपन्न झाला. या मोर्चात मातंग समाजाने आरक्षण उपवर्गीकरण करा अशी मागणी केली.यावेळी मातंग समाज बांधवांनी पिवळे झेंडे, पिवळ्या टोप्या घेऊन उपवर्गीकरणाचे समर्थन केले.माजी मंत्री उत्तम खंदारे यांनीही आक्रमक भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला.निळा झेंडा हातात घेणार नाही, असं वक्तव्य केल्याने खंदारेंवर जोरदार टीका झाली.उपवर्गीकरणासाठी पिवळा झेंडा घेऊनच लढणार, असे प्रत्युत्तर खंदारेंनी दिले आहे.