Baramati Police arrest in Bribe Case : महिलेच्या झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महेश अंकुश उगले याने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : झुंबा डान्स क्लास व जिमसंदर्भात आलेल्या तक्रारीवरुन कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी दोन लाख रुपये यापूर्वी स्वीकारल्यानंतर उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. महेश अंकुश उगले (वय ३६, ब. नं. २६३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने मंगळवार ८ सप्टेंबर रोजी बारामतीत रंगेहाथ पकडले. पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड येथे दुपारी ३ वाजता ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराची पत्नी झुंबा डान्स क्लास व जिम चालवते. मात्र या क्लासमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी क्लास तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध कारवाई करण्याबाबत अर्ज केला होता. हा अर्ज चौकशीसाठी पोलिस हवालदार महेश उगले याच्याकडे प्राप्त झाला होता.
सात लाखांच्या लाचेची मागणी
या अर्जावरुन कारवाई न करण्यासाठी उगले याने तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या वेळी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत उगले याने सात लाख रुपयांच्या लाचेबाबत चर्चा केल्याचे, यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचे आणि उर्वरित पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नमूद केले आहे.
Guwahati Murder : नवविवाहित बायकोला संपवलं, जेलबाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीचाही काटा काढेन, नवऱ्याचा इशारा, अनैतिक संबंधातून घटना
पाच लाखांची रक्कम घेताना रंगेहाथ सापडला
त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. त्यावेळी उगले याने तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Rakesh Mehta : दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरी बॉडी सापडली, चिठ्ठीतून कारणांचा उलगडाही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलिस हवालदार प्रवीण तावरे, पोलिस कॉन्स्टेबल आश्विन कमकर व चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.
ठाणे महापालिका कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात
दुसरीकडे, ठाणे महापालिकेच्या वागळे प्रभाग समितीमधील कर्मचारी देवेंद्र कोळी या लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदारांनी त्यांच्या भागीदारीत असलेल्या कंपनीसाठी एक कार्यालय विकत घेतले आहे. या कार्यालयाच्या मालमत्ता कराच्या पावतीमधील नावात बदल केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी वागळे प्रभाग समिती कार्यालयातील मालमत्ता कर वसुली विभागात कार्यरत असलेला शिपाई कोळी याने तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर कोळी याला ताब्यात घेण्यात आले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा