• Wed. Sep 2nd, 2026

Pune News : पुण्यातील मतदार 28 लाखांनी घटले, SIR नंतर प्रारुप यादी जाहीर, भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ, हडपसरचे व्होटर निम्म्यावर

मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार पुण्याची मतदारसंख्या ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी झाली आहे. यापूर्वीच्या मतदारयादीच्या तुलनेत २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांचा प्रारूप यादीत समावेश झालेला नाही. प्रारूप यादीतील मतदारांमध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष, ३० लाख ६२ हजार १२ महिला आणि ३८३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed