• Wed. Sep 2nd, 2026

Thane Marathon :तब्बल सहा वर्षांनी झालेली ३२ वी ठाणे मॅरेथॉन ठरतेय वादाचं कारण ;विरोधकांनी प्रशासनाला धरलं धारेवर , ‘मॅरेथॉन’वरून टीकास्त्र

Thane Marathon ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेची सुरूवात जरी व्यवस्थित झाली असली तरी मात्र शेवट तितकासा गोड नव्हता.पदक आणि अल्पोपहार न मिळाल्याने मुख्य स्पर्धेतील स्पर्धक आणि शालेय विद्यार्थ्यांनी प्रचंड गदारोळ केला.त्यामुळे प्रशासनाला विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,ठाणे:तब्बल सहा वर्षांनी ठाणे महापालिकेत महापौर, पदाधिकारी व नगरसेवक विराजमान झाल्यानंतर पार पडलेली ३२वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांच्या कामगिरीपेक्षा आयोजनातील त्रुटींबाबत होणाऱ्या आरोपांमुळे चांगलीच गाजली. या स्पर्धेवरून राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, कॉकरोच जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल , विरेधकांनी प्रशासनाला धरले धारेवर

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पदक आणि अल्पोपहार न मिळाल्याने मुख्य स्पर्धेतील स्पर्धक आणि शालेय विद्यार्थ्यांनी प्रचंड गदारोळ केला. हा प्रकार समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याबाबत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेचे तत्कालीन महापौर स्व. सतीश प्रधान यांनी शहरातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे आणि नामवंत तसेच नवोदित धावपटूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या मॅरेथॉनची सुरुवात केली होती.

Maharashtra TimesMPSC Paper Leak Case : मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला अटक; औषध निरीक्षक पेपरफुटी तपासाला वेग

अन्यथा मनसे या प्रश्नावर न्यायालयात धाव घेईल

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या विविध भागांतून नामवंतधावपटूया स्पर्धेत सहभागी होत होते. मात्र, यंदा स्पर्धा उशिरा सुरू होणे, पदकवाटपातील गोंधळ, ई-सर्टिफिकेटबाबतच्या अडचणी, अल्पोपहाराची उशिरा झालेली व्यवस्था तसेच इतर गैरसोयींमुळे स्पर्धकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केला. याबाबत मुल्ला यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले आहे. तसेच पालिकेने या स्पर्धेच्या खर्चाचा योग्य ताळेबंद मांडावा, अन्यथा मनसे या प्रश्नावर न्यायालयात धाव घेईल, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

‘महासभेची मंजुरी नाही’

प्रत्येक खेळाडू व नागरिकाकडून शुल्क आकारणी करण्यात आली होती. शुल्क आकारणीबाबत कोणतेही नियोजन प्रथम बैठकीत अथवा महासभेच्या चर्चेत मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणत्या आधारे शुल्क आकारण्यात आले, याचा खुलासा करावा आणि आकारलेले शुल्क त्वरित परत देण्यात यावे, अशी मागणीही मुल्ला यांनी केली.

Maharashtra TimesKDMC News: स्वीपिंग मशीन ठरतेय महापालिकेसाठी अडचण; १४ स्वच्छता यंत्रांनी करायचे कोणते काम , ‘स्वच्छते’चंच ओझं
तसेच ढिसाळ नियोजनाची त्रयस्थ समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. जबाबदार अधिकारी व यंत्रणेची भूमिका यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे मुल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा