Bavdhan Police : भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्याचा ठपका पोलिसांवर ठेवत न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदा ठरवली आणि त्याला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना व्हॉट्सअपद्वारे पाठविणे पुण्यातील बावधन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्याचा ठपका न्यायालयाने पोलिसांवर ठेवला आहे; तसेच आरोपीची अटक बेकायदा ठरवून त्याला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.
सोनसाखळी चोरी प्रकरणात तरुणाला अटक
चांदणी चौकात २८ मे २०२५ रोजी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी धायरी येथील २८ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याला पौड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने चोरलेले दागिने हस्तगत करायचे असून, त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली.
अटक बेकायदा असल्याचा वकिलांचा युक्तिवाद
आरोपीच्या वतीने ॲड. केतनकुमार जाधव आणि ॲड. शुभम बलकावडे यांनी आरोपीची अटक बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आरोपीला अटक करताना त्याची माहिती व ताब्याचे ठिकाण पोलिसांनी तत्काळ आरोपीचे नातेवाइक किंवा मित्राला कळवावे आणि पोलिस ठाण्यात त्याची नोंद करावी, असे स्पष्टपणे नमूद आहे.
मात्र, पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांना केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून ही माहिती दिली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ४८ अंतर्गत बंधनकारक तरतुदीचे पालन केले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. जाधव यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडी मागणारा अर्ज फेटाळून त्याची अटक बेकायदा ठरवली; तसेच त्याला तातडीने मुक्त करण्याचे आदेश दिले.
मिरा रोडमध्ये चार कोटींचे दागिने चोरणाऱ्यांना अटक
दुसरीकडे, मिरा रोडमधील क्विन्स पार्क परिसरातील शगुन ज्वेलर्समधून सुमारे चार कोटी रुपये किमतीचे ४ किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन जणांना राजस्थानमधून अटक केली आहे. दिनेश रावत हा दुकानातील कामगार असून, त्याने ललित सिंहच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Bandra Accident : 15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण मोबाईलवर बोलत कार चालवणाऱ्या महिलेने काळजाचा तुकडा हिरावला, मुलगा गेल्याचं सत्य आई अजून स्वीकारेनाही चोरी १९ ऑगस्ट रोजी झाली होती. ज्वेलर्सचे मालक राजेश बापना यांनी याबाबत नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकानात काम करणारा दिनेश रावत चोरीनंतर फरार झाल्याने त्याच्यावर संशय होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो जयपूर येथे गेल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेने जयपूर येथून दिनेश रावत आणि चोरीच्या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या ललित सिंह याला अटक केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा