Megha Rawal : घटनास्थळावरुन मिळालेले सीसीटीव्ही फूटेज अस्पष्ट असल्यामुळे कार अपघातावेळी मेघा फोन वापर करत होती की नाही, याची खात्री करता आली नसल्याचे पोलीस म्हणाले. तर तसा सीडीआर नसल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला
मंगळवारी संपलेल्या एका दिवसाच्या पोलीस कोठडीदरम्यान तपासातून कोणताही नवीन दुवा किंवा पुरावा हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दंडाधिकारी ई. टी. इंगळे यांनी आरोपी मेघा रावल हिची कोठडी वाढवण्याची पोलिसांची विनंती फेटाळून लावली. तिच्या जामीन अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील जिजामाता गार्डनसमोर रविवारी दुपारी हा अपघात झाला होता.
सीडीआरनुसार फोन वापरत असल्याचा पुरावा नाही
अधिक पोलीस कोठडीला विरोध करताना मेघा रावलच्या वकील अंकिता सिंग आणि भव्या शाह यांनी सांगितले की, गाडी चालवताना किंवा अपघाताच्या वेळी मेघा फोनवर बोलत होती, हे सिद्ध करणारा कोणताही ‘कॉल डेटा रेकॉर्ड’ (सीडीआर) आढळलेला नाही. कलम १०५ (सदोष मनुष्यवध) लागू करण्यासाठी कोणतेही ठोस कारण नाही; हे कलम सहसा मद्यपान करुन गाडी चालवणे यांसारख्या अत्यंत निष्काळजीपणाच्या कृत्यांसाठी लावले जाते.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज अस्पष्ट
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरुन मिळालेले सीसीटीव्ही फूटेज अस्पष्ट होते आणि त्यावरुन मेघा रावल त्यावेळी फोनचा वापर करत होती की नाही, याची खात्री करता आली नाही. मेघाच्या वकिलांनी सांगितले की, गाडीची धडक बसून लहान मूल पडल्याचे समजल्यानंतरच त्यांनी आपल्या पतीला फोन केला होता. त्यांचा फोन फॉरेन्सिक तपासणी आणि सीडीआर तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
Crime News : सोशल मीडियावरील मैत्रीतून लव्ह मॅरेज, पण दीड वर्षातच फिस्कटलं, मेहुणीच्या दाराला कडी घातली, 27 वर्षीय पत्नीचा जीव घेतला
तक्रारदार आणि आरोपीतील वादाची पडताळणी
पोलीस निरीक्षक सचिन राणे यांनी न्यायालयात सांगितले की, तपास पथकाने वांद्रे येथील माऊंट मेरी रोडवरील एका दूध विक्रेत्याचा जबाब नोंदवला आहे. तक्रारदार, मेघा रावल आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात काही वाद होता का, याचाही पोलिसांनी तपास केला; मात्र त्यात कोणतीही आक्षेपार्ह माहिती आढळली नाही.
दोन दशकांनी आयव्हीएफद्वारे पुत्रप्राप्ती
मयत अंश गुप्ता याच्या न्यायालयात उपस्थित असलेल्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी मेघा रावल हिच्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप केला. त्याचे वडील राजेंद्र गुप्ता (४७) यांनी सांगितले की, लग्नानंतर जवळपास दोन दशकांनी आयव्हीएफद्वारे अंशचा जन्म झाला होता. त्यांनी मेघाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. “तो अभ्यासात हुशार होता आणि तो पोलीस अधिकारी बनावा, असे आमचे स्वप्न होते.” असेही त्यांनी सांगितले.
कुटुंबाचा मेघावर धावून जाण्याचा प्रयत्न
सुनावणीनंतर मेघा रावल हिला पोलीस वाहनात नेले जात असताना अंशच्या कुटुंबीयांनी तिच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी मेघाचा बचाव करत तिला गाडीतून नेले, तेव्हा गुप्ता कुटुंबीयांनी गाडीच्या मागे धावत त्यावर हात आपटले.
Indian Women killed in US : दोन भारतीय महिलांना अमेरिकेत संपवलं, एकामागून एक जीव घेतला, मैत्रिणीलाच अटकसंतप्त जमावाकडून नुकसान होऊ शकते या शक्यतेमुळे, वांद्रे पोलिसांनी मेघा रावल हिची एसयूव्ही पोलीस ठाण्याच्या आवारातून सुरक्षित ठिकाणी हलवली आहे. डीसीपी (पश्चिम विभाग-२) मोहित गर्ग यांनी सांगितले की, अपघातानंतर मेघा रावल हिने अंशला एसयूव्हीमधून तातडीने रुग्णालयात नेले होते.
