• Thu. Sep 3rd, 2026

Mumbai News: मुंबई महापालिकेत ‘कॅश फॉर ट्रान्स्फर’चा संशय; भाजप आमदार कोटेचा यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

BMC Mumbai: मुंबई महापालिकेत ‘कॅश फॉर ट्रान्स्फर’चा संशय आल्याने भाजप आमदार कोटेचा यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे चौकशीची लेखी मागणी केली आहे.

अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून त्यासंदर्भातील ‘दरपत्रका’सहित माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्याकडे पत्राद्वारे माहिती मागितली होती. मात्र, तब्बल २६ दिवस उलटूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आमदार कोटेचा यांनी संशय व्यक्त केला आहे.

Maharashtra TimesRamesh Mhatre: म्हात्रे पुन्हा अडचणीत! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून संकेतयाआधी २०२५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी १६५ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र तक्रारीनंतर ते आदेश रद्द झाले होते. त्यानंतर १५ मे २०२६ रोजी जुन्या प्रस्तावातील सुमारे ५० टक्के अभियंत्यांचा समावेश असलेला नवीन बदली प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याविषयीची माहिती मिळताच मी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना त्याची तक्रार केल्यावर त्यांनी तातडीने तो प्रस्ताव रद्द केला, असे आमदार कोटेचा यांनी सांगितले. हा प्रस्ताव तयार करणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे ५ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र लिहून माहिती मागितली. परंतु, पत्राला २६ दिवस उलटूनही उत्तर मिळाले नसून या विलंबामुळे ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आपला संशय अधिक तीव्र होत असल्याचे आमदार कोटेचा यांनी अधोरेखित केले.

Maharashtra TimesEknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रियामुख्य सचिवांकडे कारवाईची मागणी

विधानसभा सदस्याने अधिकृतरीत्या मागितलेल्या माहितीला उत्तर देण्यास होत असलेला विलंब हा गंभीर प्रकार असल्याचे नमूद करत कोटेचा यांनी मुख्य सचिवांकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच माहिती देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा