बैठकीला भाजपतर्फे महापौर मंजूषा नागपुरे आणि सभागृहनेते गणेश बीडकर, तर ‘राष्ट्रवादी’कडून आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेते नीलेश निकम आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे उपस्थित होते.
Pune News: स्मशानभूमी पाण्यात! कमरेभर पाणी, गाळातून बॉडी नेण्याची वेळ; अंत्यविधीसाठी मनस्तापअमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून झालेल्या सुमारे ३८ लाख रुपयांच्या कामांचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत दोन्ही नगरसेवकांची १२ कोटी रुपयांची तरतूद शून्य केली. यावरून सभागृहात आणि बाहेर आंदोलनांसह आरोप-प्रत्यारोप रंगले.
महापालिकेतील वाद राज्यभर पोहोचू नये यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या बैठकीस भाजपकडून बीडकर, तर ‘राष्ट्रवादी’कडून तुपे, टिंगरे उपस्थित होते. दिवंगत नेते अजित पवार यांच्या तैलचित्रासाठी जागेची पाहणी करण्याच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे नेते बीडकर यांच्या कार्यालयात एकत्र आले. मुख्य सभागृहाबाहेर तैलचित्रासाठी जागा निश्चित केली आहे.
Pune News : पुण्यातील मतदार 28 लाखांनी घटले, SIR नंतर प्रारुप यादी जाहीर, भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ, हडपसरचे व्होटर निम्म्यावरटिंगरेंना दिलासा; बालवडकर प्रतीक्षेत
या तडजोडीत सुहास टिंगरे यांचा रोखलेला निधी परत देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, अमोल बालवडकर यांच्या निधीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे टिंगरेंची वादातून सुटका झाली; पण बालवडकर अद्याप ‘लटकले’ असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. निधीबाबत ‘राष्ट्रवादी’कडून भाजपला पत्र देण्यात येणार आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार बैठक झाली. आमच्यात मतभेद असले तरी मनभेद नाहीत. शहराच्या विकासासाठी आम्ही राज्यात आणि पुण्यात एकत्र आहोत. ‘राष्ट्रवादी’कडूनही सहकार्य मिळेल. -गणेश बीडकर, सभागृह नेते
दिवंगत नेते अजित पवारांचे तैलचित्र लावण्याची जागा पाहण्यासाठी महापालिकेत जमलो होतो. या वेळी विकासकामांबाबत चर्चा झाली. महायुतीचा सन्मान राखला जावा आणि पुणेकरांच्या हिताचे काम व्हावे, अशी चर्चा झाली.– चेतन तुपे, आमदार
