शेतीची मशागत, पाणीपुरवठा, ट्रॅक्टर व पंपासाठी इंधन अत्यावश्यक असताना रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनाच दोष देणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या ‘शेतकरी पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार करीत आहेत’ या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
पंपांवर लागलेल्या लांबलचक रांगा, तासनतास प्रतीक्षा, तसेच कृषी कामांसाठी डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. वाहनचालक, व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांनी इंधन पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित केला.
रोहित पवार यांनी पेट्रोल पंपचालक दीपक रुंदाळ यांच्याकडून व्यवस्थापनाची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देणे, पुरवठा तातडीने सुरळीत करणे आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, अशी मागणी त्यांनी केली.
Nashik Politics: नाशिकच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेचे जुळेना सूत; इच्छुकांच्या मुंबई-जळगावला वाऱ्या
सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात टंचाईमुळे वाहतूक, शेती आणि व्यापारी व्यवहारांवर परिणाम होत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, भारत कटके, मनोज सोनवणे, दिनेश सोनवणे, जनार्दन सोनवणे उपस्थित होते.
कांदा खरेदी दरात केंद्राकडून वाढ
लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रब्बी कांदा २०२६ साठी किमान आश्वासित खरेदी किंमत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मंगळवारपासून (दि. २६) प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर लागू राहणार असल्याचे आदेश केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलमार्फत जारी करण्यात आले आहेत.
