Pune-Sainagar Shirdi Express : साईबाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी! आजपासून ‘पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे स्थानकावरून ‘पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच ‘पुणे यार्ड रिमॉडेलिंग’ आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणी करण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हडपसर येथून ‘पुणे – दानापूर अमृत भारत एक्सप्रेस’लाही हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विवेक कोल्हे, विधान परिषद सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
