• Sat. Jun 6th, 2026

    Devendra Fadnavis: शिवसेना, राष्ट्रवादी अडली, विधानपरिषदेचा तिढा कसा सुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका

    Devendra Fadnavis: शिवसेना, राष्ट्रवादी अडली, विधानपरिषदेचा तिढा कसा सुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रही भूमिकेमुळे महायुतीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या मतदारसंघांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या तीन जागांवर मित्र पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती देतानाच, ‘आम्ही एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढू’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

    विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपने शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादीला दोन जागा देऊ केल्या आहेत. मात्र, सेनेने सात आणि राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेसाठी आग्रह धरला आहे.

    ‘जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, तर राष्ट्रवादीसोबत पुण्याच्या जागेबाबत चर्चा केली जात आहे. अजून मार्ग निघालेला नाही. मात्र, आम्ही तिघेही एकत्र बसून मार्ग काढू. या चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल असा मला विश्वास आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

    ‘आंबेनळीची दुर्घटना दुर्देवी’

    ‘आंबेनळी घाटात गाडी दरीत कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी आहे. यासंबंधी पहिल्यांदा कुणालाही माहिती नव्हती. पण, हे बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर शोध घेण्यास सुरूवात केली. पुढील कारवाई चालू आहे’, असे फडणवीस म्हणाले.

    ‘पुढची नीट परीक्षा योग्य पद्धतीने’

    नीट पेपरफुटी प्रकरणामुळे नैराश्यातून आत्तापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याबद्दल विचारले असता, ‘ज्या लोकांनी नीट पेपरमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड अन्याय केला आहे. केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेने याची पाळेमुळे खणून काढत अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे पुढील नीटची परिक्षा अतिशय योग्य पद्धतीने होईल. कुणालाही गडबड करता येणार नाही’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

    ‘हिंसा करणाऱ्यांवर कारवाईची सूचना’

    इंधन तुटवड्यावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर विरोधकांनी टीका केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, ‘सध्या जागतिक संकट आहे. जगात अनेक देशांनी पेट्रोल-डिझेलची आणीबाणी घोषित केली आहे. काही ठिकाणी दोन-दोन दिवस लॉकडाऊन आहे. तरीही पेट्रोल-डिझेल देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. काही ठिकाणी लोक जमा झाल्याने कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी हिंसक प्रवृत्ती दिसत आहे. त्यामुळे विनाकारण हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत’, असे फडणवीस यांनी सांगितले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed