• Thu. Jun 18th, 2026
    Tribal Student School Uniform : अखेर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार; आश्रमशाळांमध्ये कधीपर्यंत ड्रेस उपलब्ध होणार; मंत्री अशोक उईकेंची माहिती

    Nashik Tribal Student School Uniform : ‘तांत्रिक कारणामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्यास विलंब झाला आहे. येत्या ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल’, असं आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी म्हटलं आहे.

    नाशिक आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थी गणवेश प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    विनोद पाटील, नाशिक : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे गणवेश देण्यात विलंब झाल्याचे मान्य करत येत्या ५ जुलैपर्यंत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

    शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश व नाइट ड्रेस नाही

    आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यात शिक्षण घेणाऱ्या सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी पहिल्या दिवशी दोन गणवेश, नाइट ड्रेस, वह्या, पुस्तके, दप्तर, बूट या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश व नाइट ड्रेस मिळाले नाहीत. तर, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. त्यामुळे जुन्याच गणवेशात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशोत्सव साजरा करावा लागला. सन २०२४-२५ या वर्षात सोलापूरस्थित दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या जगदंबा रेडिमेड ड्रेसेस या संस्थेकडून शासनाच्या थेट दरनिश्चिती धोरणानुसार गणवेश व नाइट ड्रेसची ११५ कोटींची खरेदी करण्यात आली. या गणवेश खरेदीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
    Maharashtra TimesOperation Tiger UBT Spilt : लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला सकारात्मक संकेत, ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार!
    उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेबाबतचा दावा फेटाळून लावत विभागाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. विभागाने निविदाप्रक्रिया राबवली तरी, त्यालाही संस्थेने आव्हान दिल्याने वर्षभर मुलांना गणवेश मिळाले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरही गणवेश मिळाले नाहीत. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर आदिवासी मंत्री डॉ. उईके यांनी ५ जुलैपर्यंत गणवेश देण्याची घोषणा केली.

    न्यायालयीन आदेश, शासन धोरणानुसार प्रक्रिया

    शासकीय आश्रमशाळांसाठीची गणवेश खरेदीची प्रक्रिया न्यायालयीन आदेश व शासनाच्या खरेदी धोरणानुसार कार्यवाही केल्याचा दावा आदिवासी विभागाने केला आहे. संबंधित विषय हा सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने विभागाकडून लागू कायदे, न्यायालयीन निर्देश आणि शासन धोरणाच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्टीकरण विभागाने दिले. उद्योग विभागाने १ डिसेंबर २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये सुधारित खरेदी धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणातील परिच्छेद ५.१५ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थाकडून गणवेश खरेदी करण्याचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
    Maharashtra TimesOperation Tiger UBT Spilt : लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला सकारात्मक संकेत, ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार!
    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा न्यायालयीन निर्देशाकडे दुर्लक्ष केलेले नसल्याचे विभागाने म्हटले आहे. या प्रकरणात शासनाच्या खरेदी धोरणाची अंमलबजावणी, दिव्यांगांसाठी असलेल्या आरक्षण तरतुदीचा वापर आणि शासकीय आश्रमशाळांसाठी गणवेश खरेदीची प्रक्रिया या संबंधित मुद्दे समाविष्ट आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कोणताही निर्णय घेताना न्यायालयीन आदेश व शासन धोरणाच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागत आहे. शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश व आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे, सार्वजनिक निधीचा जबाबदारीने वापर करणे, पारदर्शकता राखणे आणि कायदेशीर शुचितेचे पालन करणे यासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध असल्याचे विभागाने केलेल्या खुलाशात म्हटले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा