Nashik Crime News : अघोरी शक्तींचा धाक, कुटुंबाला 2 एकर शेती अन् दीड लाख रुपये घेऊन फसवलं
गुप्तधन काढून देणे, शाप दूर करणे आणि अघोरी शक्तींचा धाक दाखवून एका कुटुंबाची २ एकर शेती आणि रोख दीड लाख रुपये हडप केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी (रा. आनंदनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन नवनाथ देवकर (वय २६, रा. लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
