Vidhan Parishad Election 2026: महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली असली तरी महायुतीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावत केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चेही पडसाद या मतदानात उमटते का हे पाहावे लागणार आहे. क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप बजावला आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी होत असलेल्या या निवडणुका गाजली ती महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे. या माघारीमुळे सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित जागांवरही महायुतीच्याच उमेदवारांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीतील पक्षांनी खबरदारी घेतली असून महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडल्यास इतर कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये, अशा आशयाचे व्हिप बजावण्यात आले आहेत. तसेच, या व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.
Tukaram Mundhe यांच्या अधिकाऱ्यांची मुंबईत दोन ठिकाणी धाडी, चिली आणि सोया सॉस जप्त; एनर्जी ड्रिंकच्या विरोधातही कारवाई
कोण करणार मतदान?
महापालिकेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य
आमने-सामने कोण ?
सोलापूर राजेंद्र राऊत (भाजप) वि. वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप) वि. शरद तायडे (शिवसेना उबाठा) वि. रेश्मा काळे (बंडखोर)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप) वि. अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी शप) वि. किशोर धुमाळ (अपक्ष)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप) वि. रामदास पाटील (काँग्रेस)
नागपूर (पोटनिवडणूक) डॉ. राजीव पोतदार (भाजप) वि. अतुल लोंढे)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप) वि. नरेश ईश्वरकर
नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना) वि. गोकुळ गीते (अपक्ष)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप) वि. हर्षदीप देशमुख (काँग्रेस)
धाराशीव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप) वि. महेश देशमुख (काँग्रेस)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना) वि. डॉ. विवेक नावंदर
छत्रपती संभाजीनगर – जालना सुहास शिरसाट (भाजप) वि. गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)
Rajabhau Waje Emotional : ‘पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणारत राहणार नाही’, राजाभाऊ वाजे भावूक
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
रवींद्र फाटक (ठाणे, शिवसेना)
अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस)
विक्रम काकडे (पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस)
दुष्यन्त चतुर्वेदी (यवतमाळ, शिवसेना)
अरुण लखानी (वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, भाजप)
प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर, भाजप)
