• Thu. Jun 18th, 2026
    Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर

    मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती ओढावली असून, त्याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, बैठकीत यासंदर्भातील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना पाणी जपून वापरण्याचा सल्ला प्रशासनाला दिल्याचे कळते. येत्या २३ जूननंतर मान्सून पूर्ववत होईल, असा अंदाज बैठकीत वर्तविण्यात आला आहे.

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जलसंपदा विभागातर्फे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबत विशेष सादरीकरण करण्यात आले. या अहवलानुसार राज्यातील सुमारे ३ हजार २८ धरणांमध्ये १,४४२.३४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.

    Mumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू
    गेल्यावर्षी हेच प्रमाण ३१ टक्के इतके होते. दरम्यान, बैठकीत राज्यातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीत २३ जून नंतर मान्सून पूर्ववत सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. याअगोदर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाणीसाठा जपून वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत पाणी जपून वापरण्याची सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

    दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाणीसाठा जपून वापरण्याबाबत विशेष सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय अवैध उपसा रोखण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

    राज्यातील धरणांची स्थिती
    विभाग -गेल्यावर्षीचा पाणीसाठा -यंदाचा पाणीसाठा

    नागपूर- ३३ टक्के —३६ टक्के
    अमरावती- ३८ टक्के —३८ टक्के
    छत्रपती संभाजीनगर- ३१ टक्के —२७ टक्के
    नाशिक- ३१ टक्के —२५ टक्के
    पुणे- २८ टक्के —१४ टक्के
    कोकण- ३४ टक्के —३० टक्के
    एकूण- ३१ टक्के —२५ टक्के
    Maharashtra TimesOperation Tiger UBT Spilt : लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला सकारात्मक संकेत, ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार!
    केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या बैठकीत पीकआढावा
    नवी दिल्ली : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी अवर्षणाच्या छायेतील राज्यांसह खतांची उपलब्धता, बाजारभाव, जलाशयांची पातळी आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा आढावा घेतला. एल निनोच्या संकटामुळे सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या नऊ ते दहा राज्यांमधील जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर विस्तार संस्थांसोबत नियमित बैठका घेण्याचे निर्देश चौहान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. राज्यांनी पावसाची ओढ जाणवण्याची चिन्हे असलेल्या जिल्ह्यांची स्पष्टपणे ओळख करून पीक-विशिष्ट पर्यायी योजना आगाऊ तयार करण्याचेही त्यांनी आवाहन केले. अशा प्रत्येक असुरक्षित जिल्ह्यासाठी जलसंधारण, ओलावा व्यवस्थापन, मिश्र पीक पद्धती आणि पर्यायी पीक पद्धतींवर विशेष लक्ष देऊन व्यावहारिक धोरण विकसित केले पाहिजे यावर चौहान यांनी भर दिला.

    सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांपर्यंत भीती निर्माण करणारी माहिती पोहोचवण्याऐवजी, वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित विश्वासार्ह आणि उपाय-केंद्रित संदेश पोहोचवणे हे सरकारी अधिकाऱ्यांचे प्राधान्य असावे. – शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed