निवडणूक काळात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आलं तर कर्जमाफी करू असा आश्वासन दिलं होतं.आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज स्वतःच भराव असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याला दोन दिवस होत नाही तोच शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारा निर्णय सरकारने घेतला आहे.भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या दोन सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 436 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.
लाडक्या बहिणीला पैसे आणि दाजी फाशी घेऊन मेला पाहिजे अशी गत कर्जमाफीवरून शेतकरी संतापले
