वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत.
सातबारा कोरा करू अस म्हटलं २८ तारखेला सांगितलं कर्ज भरा
वाशिमच्या मुख्य बाजारात किडनी आणि इतर अवयव विक्रीसाठी आले असता सतीश इढोळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी आज वाशिम येथील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये माझ्या किडन्या घेऊन विकायला आलो आहे. कारण सांगितले होते की, सातबारा कोरा करू आणि २८ तारखेला सांगितले की कर्ज भरा. कर्ज भरणार कसं? माझ्या किडनीची किंमत ६० हजार रुपये ठेवली आहे. माझ्या पत्नीच्या किडनीची किंमत ४० हजार रुपये ठेवली आहे आणि माझ्या मोठ्या मुलाच्या किडणीची किंमत २० हजार रुपये ठेवली आहे आणि लहान मुलाच्या किडनीची किंमत ही १० हजार रुपये ठेवली आहे. या किडन्या घ्या आणि आमच्या डोक्यावरच्या कर्जातून मुक्त करा. हेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.
किडनी विकायची वेळ का आली?
किडनी विकायची वेळ का आली या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शेतमालाला भाव नाही. सरकारने सोयाबीन ३ हजारांना विकली. सरकारने सांगितले कर्जमाफ करू त्या भरवश्यावर आम्ही बसलो. सरकारने आश्वासन दिले आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. पण शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला असा लागेल की यांचं सरकार पलटी होईल. शेतमालाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सोयाबिनला भाव नाही. शेतकऱ्याने विकावं काय हेच कळतं नाही. बियाणे महाग आहे. खत महाग आहे. पुढची पेरणी आम्ही करू शकत नाही. सरकारमुळे ही आमची दशा झाली आहे.