Buldhana Crime: काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला होता. पण हा अपघाती मृत्यू नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेच्या पतीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक वृषाली प्रकाश गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. वृषाली यांचे पती प्रकाश अनंत गावंडे यांच्यासह घरातल्यांसह सतत वाद होत असे. त्यामुळे मृतक शिक्षिकेने संग्रामपूर पोलीस स्टेशन मध्ये कौटुंबिक छळाची तक्रार सुद्धा दिली होती. परंतु त्यांनंतर त्यांचा मृत्यू झाला. 3 मार्च रोजी त्यां घटना घडल्यानंतर मृतक शिक्षकेचा भाऊ सुमित डोसे याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.
Nagpur News: दोन वर्षांपूर्वी बाप हरपला, आता मायेचे छत्रही गेले; मुलांसाठी झिजणाऱ्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू
कसा झाला अपघात?
घटनेची पार्श्वभूमी पाहून जळगाव जामोद पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत पती प्रकाश अनंत गावंडे वय वर्ष 37 राहणार पातुर्डा व टाटा छोटा हत्ती मालवाहू क्रमांक MH 28 BB 57 53 चा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी यांनी मृतक वृषाली स्कूटर क्रमांक एम एच 28 एएल 58 15 ला मागून जोरदार धडक देऊन खून केल्याचे उघड केले. सदर प्रकरणात पती प्रकाश व त्याचा मित्र मंगेश चौहूलकर राहणार पातुर्डा यांनी मध्यस्थी करून वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयाची सुपारी देऊन सदर घटना घडवून आणली होती हे ही पोलिसांच्या तपासात समोर आले.
Ahilyanagar Crime : जामखेड कावेरी हॉटेल गोळीबार प्रकरण; 29 वर्षीय रोहित पवारवर जीवघेणा हल्ला, मुख्य सूत्रधाराला अटक
आरोपी विरुद्ध कलम 106 1 281 भारतीय न्याय संहिता सह कलम 134 177 मोटर वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत.
