Double Decker Metro: कल्याण-डोंबिवली व परिसरातील भागांमध्ये सध्या अनेक मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. हे सर्व मार्ग डबल डेकर करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच नवे मेट्रो मार्ग
मुंबईतील एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठाणे स्थानकापुढील गर्दी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना म्हणून रस्तेमार्गिकांचा विस्तार आणि शेवटच्या घटकापर्यंत मेट्रोमार्ग कसे विकसित करता येतील, याबाबतचे प्रस्ताव मांडण्यात आले. यात मेट्रो ५ अ, ५ ब आणि ५ क, मेट्रो १२ आणि मेट्रो १२ अ या सर्व मार्गांसाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यासह डबलडेकर पद्धतीने या मार्गांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील प्रमुख मेट्रो आणि रस्ते मार्गांचा समावेश आहे.
Mumbai Metro 11वर पाच नवे स्थानकं, धारावी खालून थेट वांद्रे टर्मिनसपर्यंत भुयारी मार्गिका; कसा असेल नवा मार्ग?
कल्याणच्या मेट्रो १२ (कल्याण-तळोजा), मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर), मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो ५-अ (कल्याण-उल्हासनगर चिखलोली), शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग आणि वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्गासाठी आराखडा मंजूर करण्यात आला असून हे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. तर, प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोमार्गिकांचा आणखी उप-टप्प्यांत विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात मेट्रो ५-ब चिखलोली ते बदलापूर, मेट्रो ५-क दुर्गाडी ते टिटवाळा, मेट्रो १२-ब शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाणे आदींचा समावेश आहे.
हे सर्व मार्ग डबलडेकर पद्धतीनेच विकसित केले गेले तरी भविष्यातील वाढत्या लोकसंख्येसाठी ते फायदेशीर ठरू शकणार आहेत. यातील मेट्रो १२ आणि मेट्रो ५चे काम सुरू असून उर्वरित मार्ग या मार्गांना संलग्न असणार आहेत. कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या ‘डबल डेकर’ पॅटर्नमुळे जागेची बचत होईलच, पण एकाच वेळी रस्ते आणि मेट्रो वाहतूक सक्षम झाल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.
Mumbai Metro: ‘लास्ट माईल’ सेवेवर प्रवाशांनी पाठ फिरवली! मेट्रो 3च्या अनेक स्थानकांवरील बस सेवा बंद; प्रतिसाद का नाही?
अंबरनाथ-उल्हासनगरला मोठा दिलासा
मेट्रो ५-अ ही मार्गिका दुर्गाडी नाक्यावरून कल्याण बिर्ला महाविद्यालयामार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रस्त्याने थेट चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यापर्यंत अतिशय सुलभआणि जलदगतीने प्रवास करणे सोयीचे होऊ शकणार आहे.
