तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला सुरुवात झालीय. या यात्रा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज पार पडला. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजारमार्गे आंबराईच्या रानात नेण्यात आली.. यावेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर पुढचे पाच दिवस आंबराईच्या रानात ही पालखी मुक्कामी असणार आहे.