चार महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीने तुरुंगातच गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं. आरोपीने पहाटेच तुरुंगातील शौचालयात टॉवेलने गळफास घेतला असल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच आरोपीने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने एकच खळबळ निर्माण झाली.. त्यातच विशाल गवळीच्या वकिलांनी या घटनेवर संशय निर्माण केला आहे. मला शंभर टक्के संशय आहे विशालला पोलिस यंत्रणेनेच मारलंय असा गंभीर आरोप वकील संजय धनके यांनी केलाय. तर या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी सरकार आणि प्रशासनाचे आभार मानलेत. मात्र त्याचसोबत विशाल गवळीच्या दोन तडीपार भावांवर देखील गंभीर आरोप केलेत. परिसरात त्यांची सुद्धा दहशत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केलीय.