Nanded Farmer Fruit Farming Success Story : नांदेडमधील शेतकऱ्याने फळ लागवडीतून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपारिक शेतीसह खडकाळ जमिनीवर शेतकऱ्यांने यशस्वी शेती केली आहे.
काश्मिरी ॲपल बोराची यशस्वी शेती
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकरी फेरोज खान पठाण यांची एकूण १८ एकर शेती आहे. सुरुवातीला ते इतर पिकं घ्यायचे. मात्र अपेक्षे प्रमाणे उत्पन्न काही मिळत नव्हते. त्यामुळे फेरोज पठाण यांनी शेतात फळ लागवडीचा निर्णय घेतला. काश्मिरी ॲपल बोराच्या लागवडी बाबत त्यांनी अनेक ठिकाणाहून माहिती घेतली. त्यांनतर जालना येथून साठ रुपये प्रति प्रमाणे एक हजार रोपं विकत घेतली.
Farmer Success Story : लॉकडाऊनमध्ये मुंबई सोडून गाव गाठलं, पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची लागवड; तरुणाची वर्षाला लाखोंची कमाई
दरवर्षाला लाखोंचं उत्पन्न
त्यानंतर एक एकरमध्ये ८ बाय १४ फुटावर काश्मिरी ॲपल बोराची लागवड केली. एकूण तीन एकरमधील खडकाळ जमिनीवर त्यांनी काश्मिरी ॲपल बोराची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून फेरोज खान पठाण यांच्याकडून हा फळ लागवडीचा यशस्वी प्रयोग केला जात आहे. दरवर्षी या बोराच्या लागवडीतून तब्बल १५ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं फेरोज खान पठाण यांनी सांगितलं.
Farmer Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न
विशेष म्हणजे वर्षाकाठी एक लाख खर्च येतो. सध्या काश्मिरी ॲपल बोराची तोडणी सुरू आहे. बाजारात जाऊन बोराची विक्री केली जाते. बाजारात ६० ते ७० रुपये किलो प्रमाणे या काश्मिरी ॲपल बोराला भाव मिळत आहे. काश्मिरी ॲपल बोर साधारण बोरापेक्षा आकाराने थोडं मोठं आणि खाण्यासाठी चविष्ठ देखील असतं. रंग मात्र सफरचंदासारखा असतो. विशेष म्हणजे फेरोज पठाण यांनी ६ एकरमध्ये आंबा आणि १० एकरमध्ये सिताफळचीही लागवड केली आहे. त्यातूनही त्यांना लाखोचं उत्पन्न मिळत असल्याचं पठाण यांनी सांगितलं.
कमी खर्चात, खडकाळ जमिनीतून वर्षाला १५ लाखांचं उत्पन्न; पारंपरिक शेतीसह फळ लागवडीने शेतकरी मालामाल
सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल होतं असतात, मात्र फेरोज खान पठाण यांनी खडकाळ जमिनीवर फळबाग फुलवून यशस्वी शेती केली आहे. यातून ते चांगली कमाई करत आहेत. शेतीतूनच त्यांनी आर्थिक प्रगती देखील साधली आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील हतबल न होता फळबाग लागवडीकडे वळावं, असं आवाहन फेरोज खान पठाण यांनी केलं आहेत.