Ravindra Chavan Demands Dhananjay munde Resignation : संतोष देशमुख प्रकरणी विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना आणि मंत्री धनंजय मुंडेंना घेरले जात आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली जात आहे. यातच काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनीही आता राजीनाम्याची मागणी केली आहे.
रविंद्र चव्हाण म्हणाले चौकशी निष्पक्ष होण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ १८ जानेवारीला नांदेडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. खरंतर राज्य सरकार या हत्या प्रकरणाला ज्या वेग द्यायला पाहिजे होता तो वेग देत नाहीय फक्त चाल ढकल करत आहे.असा आरोप खासदार रविंद्र चव्हाण यांनी केला.
नांदेडमध्ये विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणूक दोन्ही एकदाच पार पडल्या. निवडणुक जिंकल्या नंतर सुरक्षा मिळायला पाहिजे होतं, मात्र अद्याप मला सुरक्षा मिळाली नाही. अशी खंत खासदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदार यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. मी पोलीस अधीक्षक यांना सुरक्षेच्या दृष्टीने पत्र दिले आहे. मलाही वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागते, बऱ्याच ठिकाणी आंदोलन असतात अडचणीच्या ठिकाणी समोर जावं लागतं त्या दृष्टीने मलाही सुरक्षा मिळावी याविषयी मी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे, परंतु त्यावर अद्यापही काही कारवाई झाली नसल्याची खंत खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.