Nashik Accident News in Marathi : नाशिक मुंबई महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या अपघातामुळे उड्डानपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास पाऊन तास सर्व वाहतूक ठप्प झाल्याने मोठी वाहतकू कोंडी झालीये. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रूग्णालयात हलवण्यात येत आहे. रूग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने जमा झाला आहे. अजून मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. मात्र सहा जणांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. अपघात झालेल्या पिकमध्ये कामगार होते जे निफाड येथून देवदर्शनावरून माघारी परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर जखमींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आयशर आणि पिकअपची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. देवदर्शनाहून परतत असताना काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र चालकाचे गाडीवरून नियंत्रण कसे सुटले? याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राहुल राठोड वय २०
लाकेश निकम वय १८
अनोळखी तरुण वय -२८
अनोळखी तरुण- वय २८
अनोळखी तरूण- २५
अरमान खान -वय १५