Raigad News : सिक्कीम राज्यात कर्तव्यावर असताना पंधरा महिन्यांपूर्वी अचानक धरण फुटल्याने सैन्याची पूर्ण तुकडी (दल) वाहून गेली होती. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवान सुयोग अशोक कांबळे याला भारतीय लष्करी इतमामात त्याच्या मूळगावी मानवंदना देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावातील मौजे बौद्धवाडी येथील रहिवाशी असलेला सुयोग कांबळे हा भारतीय लष्करात गेली अठरा वर्षे कार्यरत होता. जवान सुयोग कांबळे हा ४ ऑक्टोंबर २०२३रोजी भारतातील सिक्कीम या राज्यात त्याच्या तुकडीसह ड्युटीवर होता. रात्रीच्या वेळी अचानक धरण फुटल्याने सुयोग कांबळे यांच्यासहित त्याची तुकडी (दल) हे पूर्णपणे वाहून धरणाच्या पाण्यात बेपत्ता झाले होते. त्याचा शोध सिक्कीम राज्याने घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले होते. भारतीय लष्करी नियमाप्रमाणे भारतीय जवान सुयोग अशोक कांबळे यास शहीद घोषित करण्यात आले.
आता सरकारला नाही, तर लोकांना बदलवा; प्रख्यात पर्यावरणवादी असे का म्हणाले? बोलण्यातील गर्भितार्थ काय?
आज रविवारी सैन्यदलाकडून अलिबाग जवळील कार्लेखिंड ते शेखाचे गाडीने येऊन नंतर नारंगी पर्यंत रॅली काढण्यात आली होती. शासकीय इतमामात शहीद कांबळे यास त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात येणार आली. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आमदार महेंद्र दळवी, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील पंचक्रोशीतील शोकाकुल रहिवासी इत्यादी लोकांसह अलिबाग तालुकासहित जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.