Somnath Suryawanshi Parbhani : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी जे सोमनाथ यांच्या मृत्यूला जबाबदार असतील त्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
जे जबाबदार असतील त्यांना फाशी द्या, अन्यथा परभणीत जीव देईन; सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने सुप्रिया सुळेंसमोर फोडला टाहो
खासदार सुप्रिया सुळे आज रविवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी परभणीत घडलेल्या दंगली दरम्यान न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांशी तसंच मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून नावं काढा, अन्यथा दंडासह… लाडकी बहीण योजनेवरुन छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
पुढे बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई म्हणाल्या, की माझा मुलगा कायद्याचा अभ्यास करणार होता, मग तो कायदा हातात कसा घेईल. मी आणि माझ्या पतीने दगड फोडून मुलांना शिक्षण दिलं आहे. मोलमजुरी करून चारही मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पतीच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा मृत सोमनाथ सूर्यवंशी संपूर्ण कुटुंबाचा गाडा हाकत होता. तो आईसोबत भावांचं देखील पालन पोषण करत होता. अशा माझ्या चांगल्या मुलाला पोलिसांनी अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
महिला कंपनीत आल्या, पाणी प्यायल्या आणि… १०० हून अधिक महिलांना विषबाधा; अमरावतीमध्ये खळबळ
यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाने देखील खासदार सुप्रिया सुळे यांना घटनाक्रम सांगितला. राज्य सरकारने आम्हाला दहा लाखाची मदत देऊ केली होती, त्याचबरोबर ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण केली त्या पोलिसांनी देखील ५० लाख रुपयाचे आमिष दाखवलं होतं, पण एवढी रक्कम घेऊन माझा भाऊ परत येणार नव्हता, त्यामुळे आम्ही राज्य सरकारची मदत देखील नाकारली आहे. आम्हाला सरकारच्या मदतीपेक्षा माझ्या भावाला ज्यांनी अमानुष मारहाण केली आणि त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला, त्या सर्व दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच मागणी असल्याचंही ते म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना देखील अश्रू अनावर झाले. सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा टाहो पाहून खासदार सुप्रिया सुळे प्रचंड भावूक झाल्या. येणाऱ्या काळात मयत सोमनाथ सुरक्षा कुटुंबीयांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असं आश्वासन यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं.