Mahadev Jankar: देशात १९ टक्के धनगर समाज असताना एकही खासदार, आमदार नाही. आयएएस, आयपीएस नाही. कारण काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.
नव्या वर्षात रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्याची भूमिका सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. शेतमालाचे भाव निम्म्यावर आले असताना खतांची दरवाढ थांबण्याची चिन्हे नाहीत. मेंढपाळही आपल्या प्रश्नांसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली. पंचवटी चौकातून वाडा आंदोलनाला सुरुवात झाली. बच्चू कडू व महादेव जानकर यांनी धनगरबांधवांचा वेश परिधान करून मोर्चात सहभागी झाले.
मुंबईत कोट्यवधींचा CRZ घोटाळा; १०२ सरकारी नकाशांत फेरफार, माजी सरकारी कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक
पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांची संख्या अधिक असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. विभागीय आयुक्तालयापासून दूरवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. विभागीय आयुक्तालयाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकल्यानंतर जानकर आणि बच्चू कडू यांनी संबोधित केले. जानकर म्हणाले, गद्दारांच्या मागे उभे राहू नका. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार आहे. अमरावतीचा मोर्चा ही याची सुरुवात आहे. पुणे, औरंगाबादलाही मोर्चा काढू, असे सांगितले.
ओझरमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप, ७ महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, नेमकं काय घडलं?
जगायचे तरी कसे? -बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. मेंढपाळ त्यांचे मेंढरे चारू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जगायचे तरी कसे, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. दिव्यांगांना चार महिन्यापासून मानधन मिळाले नाही. सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली आहे. परंतु त्यात स्पष्टता नाही. कोणते कर्ज माफ व कोणते नाही हे स्पष्ट नाही. सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असेही त्यांनी सांगितले.
Baba Siddique Case: २६ आरोपींकडून ३५ मोबाइलचा वापर; बाबा सिद्दिकी प्रकरणात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले. यातून नेत्यांनी मेंढपाळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चात शेतकरी, मेंढपाळ आणि प्रहारचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.