• Thu. Mar 12th, 2026
    Jalgaon News : ‘निलेशचा मोबाईल बंद आहे, त्याला उठवा’; चुलत भावाने दरवाजा उघडताच भयंकर दृश्य, पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं

    Jalgaon Police Officer Suicide : जळगावमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.

    जळगाव पोलीस निलेश पाटील आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडली असून निलेश पाटील असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला आहे. निलेश माधराव पाटील हे जळगाव एमएडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते आपल्या चुलत आजोबांच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला गावात आले होते. रात्री ते आपल्या गावी घरी थांबलेले होते.

    ‘निलेशचा मोबाईल बंद आहे’

    काल सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या आई आणि पत्नीने फोन करून संपर्क साधला. पण त्यांचा फोन बंद आल्याने, त्यांनी चुलत भाऊ सुनील पाटील यांना माहिती दिली की, ‘निलेशचा मोबाईल बंद आहे, त्याला उठवून द्या’. चुलत भाऊ सुनील पाटील हे निलेश पाटील यांना उठण्यासाठी घरी गेले. अनेकवेळा दरवाजा ठोकूनही, आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता निलेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे पाहून चुलत भाऊ सुनील पाटील यांना मोठा धक्का बसला आणि घडलेल्या प्रसंगाची माहिती कुटुंबियांना दिली या घटनेबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.
    Maharashtra TimesBaramati Accident: बारामतीत भीषण अपघात; गंभीर जखमी ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, संतापलेल्या ग्रामस्थांनी अडवला रस्ता

    आत्महत्येचा पोलिसांकडून तपास सुरू

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. निलेश पाटील यांच्या आत्महत्या मागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Maharashtra TimesBuldhana News : ‘मंगेशमुळे अनेकांचे जीव वाचले, पण आज त्याचेच प्राण गेले’; जंगलात साप सोडताना अचानक सर्पदंश, तरुण सर्पमित्राचा करुण अंत

    आजाराने मृत्यू, कागदावर मात्र अपघात

    सुमारे एक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका प्रख्यात डॉक्टरासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० लाखांचा विमा हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा