• Wed. Jan 8th, 2025
    लग्नाच्या वाढदिवशी विवाहाच्या ड्रेसमध्येच आयुष्य संपवलं; VIDEO करुन आप्तांना शेवटची विनंती

    नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये एका जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार-पाच वर्षांपासून बेरोजगारी आणि मूल बाळ नसल्याने दोघेही पती-पत्नी निराश होते.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगरमध्ये एका जोडप्याने लग्नाच्या वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या चार-पाच वर्षांपासून बेरोजगारी आणि मूल बाळ नसल्याने दोघेही पती-पत्नी निराश होते. याला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी एक व्हिडिओही बनवला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दाम्पत्याच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पती जरिल उर्फ टोनी ऑस्कर मोनक्रिप (५४) हा चार वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. तो फारसा शिकलेला नव्हता. तर पत्नी ॲनी जरिल मोनक्रिप (४५) या गृहिणी होत्या. पती जरीलची नोकरी गेल्यानंतर दोघेही चार ते पाच वर्षांपासून बेरोजगार होते. हे दाम्पत्य बेरोजगारीला कंटाळले होते. त्यांच्या लग्नाला २६ वर्षे झाली होती. मात्र तरीही दोघांना मुलं नव्हते. बेरोजगारी आणि अपत्यसुख नसल्यानं पती-पत्नी दोघांनाही निराशा सतावत होती.
    HMPV: पुण्यातील १३% मुलांना HMPV होऊन गेलाय! KEMच्या डीननं टेन्शन संपवलं; साधेसोपे उपाय सांगितले
    सोमवारी रात्री दोघेही फिरायला गेले होते. यानंतर दोघांनी जेवण केले आणि घरी परतले. जरिल आणि ॲनी यांनी सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला अणि सर्व काही ठीक असल्याचेही सांगीतले. त्यानंतर मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास पत्नी ॲनीने व्हिडीओ बनवून नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना त्यांच्या नात्यात असलेला लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलू नका अशी विनंती केली. यानंतर दोघांनीही घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केली. लग्न सोहळ्यात वापरले जाणारे कपडे परिधान करुन त्यांनी जीवनयात्रा संपवली.
    रात्री मित्रांसोबत बर्थडे; मग हॉस्टेल लॉनवर सापडली बॉडी; IIM विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
    सकाळी १० वाजून गेल्यानंतरही जरिल आणि ॲनी उठले नसल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांचा घरी गेली. मात्र, दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे महिलेने खिडकीतून पाहिले असता दोघीही पती पत्नीने घरी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed