KBMC Budget 2026: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प सोमवारी मांडण्यात आला. याममध्ये नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी सुकन्या योजनेची घोषणा केली.
महिलांसाठी भरीव तरतूद
पालिका निवडणुकीनंतर नवीन प्रशासकीय इमारतीत सोमवारी झालेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, नगराध्यक्षा सुकन्या योजनेत ८ मार्च २०२६नंतर जन्मलेल्या प्रत्येक कन्येच्या नावावर नगरपरिषद पाच हजार रुपये बँक खात्यात जमा करणार आहे. ही रक्कम १८ वर्षांनंतर व्याजासह मिळणार असून यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य व सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी २५ लाख रुपये, गर्भसंस्कार केंद्रासाठी ५० लाख तसेच महिलांसाठी स्वतंत्र २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी निधी या तरतुदी करण्यात आल्या आहेत. ‘कौशल्या नारी अभियान’साठी एक कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.
Bike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा
उत्पन्नवाढीसाठी अभय योजनेनंतर थकबाकीदारांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मालमत्ता करात सवलत देण्याचे संकेत देण्यात आले. नगरपरिषद कर्मचारी व शिक्षकांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) देण्याची घोषणाही करण्यात आली. शाळांच्या शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी एक महिन्याचा पगार राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य सुविधांवर भर
कै. शिवप्रसाद दुबे रुग्णालय उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सरकारकडे आणखी २५ कोटींची मागणी केली जाणार आहे. येथे डायलिसीस, प्रसूतिगृह, बाह्यरुग्ण विभाग, क्ष-किरण सेवा, अस्थिरोग विभाग तसेच रेबीज व सर्पदंश लसीकरण सेवा सुरू करण्यात येणार आहेत. योग भवनासाठी एक कोटी, तर भुयारी गटार योजनेसाठी ४४ कोटी रुपयांचा हिस्सा ठेवण्यात आला आहे.
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला भर दिवसा संपवलं
शिक्षणासाठी विशेष तरतूद
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्याथ्यांसाठीही १० लाखांचा निधी राखण्यात आला आहे. नगरपरिषद शाळांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या धर्तीवर गणवेश, बूट, रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. पोषण आहारात अंडी, केळी व राजगिरा लाडू देण्याचाही मानस आहे. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक संगणकीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.
