• Wed. Jan 8th, 2025
    मतदारांच्या बाबतीत अजित पवारांनी केलेले वक्तव्य चुकीचेच, बारामतीत पुतण्याने काकांना सुनावले

    Yugendra Pawar on Ajit Pawar : मतं दिली म्हणजे माझे मालक होता का तुम्ही? हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

    Lipi

    दीपक पडकर, बारामती : मतं दिली म्हणजे माझे मालक होता का तुम्ही? हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले आहेत. आजी आशाताई यांनी कुटुंब एकत्र यावे असे साकडे विठ्ठलाला घातल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार कुटुंब कालही एक होते, आजही आहे व उद्याही राहिल. त्यामुळे आजीने इच्छा व्यक्त केली त्यात गैर काही नाही. दोन्ही बाजूकडील अध्यक्ष यासंबंधीचा निर्णय घेतील. अशी प्रतिक्रिया युवा नेते युगेंद्र पवारांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

    युगेंद्र पवार म्हणाले, यापूर्वी येथे महाविद्यालयात खूनाची घटना घडली होती. त्यानंतर पोलिस अधिकाऱयांनी कडक भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु तसे घडलेले दिसत नाही. पुन्हा खूनाचे प्रकार बारामतीत झाले. शहरात कोयता गॅंंग सक्रिय झाली आहे. अल्पवयीन मुले कोयत्याने खून करत आहेत. ही दुदैवी स्थिती आहे. यासंबंधी लवकरच जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटणार असून आंदोलन हाती घेणार आहे.

    बारामतीच्या जिरायती भागातील ४० गावांना प्यायला पाणी मिळत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत ते कांद्याचे उत्पादन घेतात. पण दराअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याला योग्य दर मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बीडच्या प्रकरणावर महायुतीचे आमदारच जर मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतील तर गृहमंत्र्यांनी तो विषय गांभिर्याने घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. काही जिल्ह्यात जाती-जातीत तेढ निर्माण होत आहे, तो आपल्या हिताचा नाही असेही ते म्हणाले.

    बारामतीत गेल्या काही महिन्यात गुन्हेगारी प्रचंड वाढताना दिसते आहे. मी सातत्याने यासंबंधी बोलत आहे. अद्याप गुन्हेगारी कमी झालेली नाही. आता शेतकऱय़ांच्या कांदा आणि दूध प्रश्नी आंदोलन केले. आगामी काळात वाढत्या गुन्हेगारीविरोधात आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिला.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed