• Tue. Jan 7th, 2025

    शिर्डी प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याची सुजय विखेंची मागणी; राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘साई भक्तांच्या भावना दुखावल्या…’

    शिर्डी प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याची सुजय विखेंची मागणी; राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘साई भक्तांच्या भावना दुखावल्या…’

    Radhakrishna Vikhe Patil explanation on Sujay Vikhe: शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करण्यात यावे आणि थोडेफार शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली. मात्र त्यांचे वडील शिर्डीचे आमदार तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरुद्ध भूमिका मांडली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अहिल्यानगर : शिर्डी येथील प्रसादालयात साईबाबा संस्थानतर्फे भाविकांना देण्यात येणारे मोफत जेवण बंद करण्यात यावे आणि थोडेफार शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली. मात्र त्यांचे वडील शिर्डीचे आमदार तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरुद्ध भूमिका मांडली आहे. विखे पाटील म्हणतात, शिर्डीतील साईभक्तांना प्रसादाची व्यवस्था निःशुल्क सुरूच राहणार आहे. सुजय विखेंच्या या वक्तव्याचा अध्यात्मिक क्षेत्रातून निषेध केला जात आहे. असे असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

    शिर्डी परिक्रमा उपक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी संस्थानच्या अधिकाऱ्यांसमक्ष शिर्डीला येणाऱ्यांना २५ रुपये आकारावे आणि त्यातून येणाऱ्या पैशातून शिक्षणासाठी खर्च करावा, अशी मागणी केली. सुजय विखे म्हणाले, ‘शिर्डी संस्थानतर्फे मोफत जेवण दिले जाते. अख्खा देश येथे येऊन मोफत जेवण करतो. महाराष्ट्रातील भिकारीही येथे जमा झाले आहेत. खरे तर शिर्डीला येणाऱ्यांना २५ रुपये देऊन जेवण करणे परवडणारे आहे. त्यानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घ्यावा. वाचलेला हा पैसा शिक्षणासाठी खर्च करा.’
    ‘अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतोय, तर महाराष्टातील सगळे भिकारी…’ सुजय विखे असे का म्हणाले?
    ‘शिर्डीतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांच्या भविष्याची तयारी करून घेता आली पाहिजे. केवळ शाळांच्या इमारती चांगल्या बांधून जमणार नाही. तेथे चांगले शिक्षक आणण्यासाठी खर्च करा. इंग्रजीचे शिक्षक जर मराठीतून इंग्रजी विषय शिकवित असतील तर काय उपयोग? जे पैसे अन्नदानासाठी खर्च होतात ते पैसे आमच्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. तुम्ही निर्णय घ्या, कोणी या विरोधात आंदोलन केले तर त्यांचे काय करायचे ते पाहू.’ असेही विखेंनी नमूद केले होते.

    यावर स्पष्टीकरण देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला आहे. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता,’ असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed