Miraroad Murder Case : मिरारोडमधील शॉपिंग सेंटरबाहेर एका व्यावसायिकाला गोळी मारुन संपवण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. मात्र हल्लेखोर फरार आहे. पूर्ववैमानस्यातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
मिरारोड रेल्वे स्थानकाला लागून असणाऱ्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये ३५ वर्षीय शम्स अन्सारी उर्फ सोनूवर अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री गोळीबार करत तेथून पळ काढला होता. यात शम्स अन्सारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासा करता मिरा- भाईंदर पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली होती. त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे नालासोपारा भागातून २२ वर्षे सेफ अली खानला शनिवारी अटक केली आहे.
Pune Crime: बायकोची माफी मागत रिक्षा चालकाने संपवले जीवन, अखेरच्या चिठ्ठीत ४ नावं, पिंपरी-चिंचवड हादरलं
यावेळी त्याच्याकडे हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. तर, सैफ अलीचा भाऊ मोहम्मद आलमला बदलापूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मदचा शम्स अन्सारीसोबत व्यवसायिक आणि इतर काही गोष्टींवरून वाद होता. याच वादातून सैफ अली आणि मोहम्मदने शम्स अन्सारीची हत्या करण्याची सुपारी दिल्याची बाबत पोलीस तपासात समोर आली आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेतला जात असल्याची माहिती काशिमिरा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिली.
Navi Mumbai : हेड कॉन्स्टेबलला संपवून बॉडी लोकलसमोर फेकली, मोटरमनने पाहिलं; नवी मुंबईत काय घडलं?
तर, या प्रकरणात मुख्य आरोपींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे का? याचा देखील तपास केला जाणार आहे. दोन्ही मुख्य आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यादरम्यान चौकशीत सर्व गोष्टी समोर येणार असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
मिरारोड हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अटकेत, हल्लेखोर अद्याप फरार; पूर्ववैमानस्यातून सुपारी देऊन हत्या, प्रकरण काय?
दरम्यान, मिरारोड येथील शांती शॉपिंग सेंटरमध्ये चष्म्याचे दुकान चालवणाऱ्या शम्स अन्सारीवर शुक्रवारी रात्री अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. शम्स अन्सारी त्याच्या दुकानाबाहेर दोन सहकाऱ्यांसोबत बोलत असताना एका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. मृत शम्सचे आलम या व्यक्तीसोबत वैमनस्य असल्याची बाब समोर आली आहे. आलम याने केलेल्या एका गुन्ह्यात मृत शम्स हा साक्षीदार होता, त्या धमक्याही आल्या होत्या अशी माहिती आहे.