Authored byमानसी देवकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम26 Dec 2024, 2:44 pm
शिर्डीतील साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील भक्तांसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत असतात. आता गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचे प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने झहीर खान आणि अभिनेत्री सागरीका घाटगे या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. झहीर खान आणि सागारिका येत असल्याचे कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी उपस्थित साई भक्त आणि त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतले. तर यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना झहीर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.