प्राजक्ता ताईंना कशाला बदनाम करताय धस भाऊ? रुपाली पाटील संतापल्या
प्राजक्ता माळी, रश्मिका मंधना, सपना चौधरी यांची नावं घेऊन तुम्ही महिला कलाकारांना बदनाम करत आहात. तुम्हाला खाजगी आयुष्यात डोकवायला निवडून दिलेले नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.