काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे.महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असं सतेज पाटील म्हणाले.सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्या पद्धतीने राज्याला पुढे घेऊन जाण्यासंदर्भातले प्रयत्न दिसत नाहीत असं पाटील म्हणाले.बदलापूरच्या घटनेनंतर देखील राज्याचे गृह खाते सुधारलेले दिसत नाही अशी टीका सतेज पाटलांनी केली.