Pune Fridge Gas blast : गॅसचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुंढवा पोलिस ठाण्यात भंगार दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला
गॅसचा स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुंढवा पोलिस ठाण्यात भंगार दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद शेख (वय ५०, रा. बीटी कवडे रोड, मुंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. किशोर साळवे (वय ४०), दिलीप मिसाळ (वय ४०) हे कामगार आणि मालक महंमद सय्यद (वय ५०) जखमी झाले आहेत.
मुंढवा पोलिसांनी भंगार दुकानमालक महंमद सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीळकंठेश्वर जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बीटी कवडे रोड येथील भंगाराच्या दुकानात कामगार ‘स्क्रॅप’मध्ये आलेला फ्रिज हातोडीने फोडत होते. फ्रिजमधील कॉम्प्रेसर गॅस टाकी फुटली आणि तिचा मोठा स्फोट झाला.
Satish Wagh Murder : अक्षय-मोहिनी प्रेमसंबंध, मामाचा अडथळा; काटा काढताना ७२ वेळा वार, गुप्तांगही कापलं, कारण काय?
जखमींवर उपचार सुरू
शेजारी असलेले महंमद शेख, किशोर साळवे, दिलीप मिसाळ, महंमद सय्यद हे चौघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली; तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी डॉक्टरांनी महंमद शेख यांचा मृत्यू झाला असून, इतर तिघे जखमी असल्याचे सांगितले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
Mohini Wagh : माझ्या नवऱ्याचा जीव घेशील का? अक्षयच्या आधी मामीने ‘त्याला’ही विचारलेलं, सहा महिन्यात काय घडलं?
पुण्यातील मुख्याध्यापक काशिदला बुडाला
दुसरीकडे, काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिसोली येथील महात्मा जोतिराव फुले हायस्कूलचा ११ जणांचा समूह काशीद समुद्रकिनारी पर्यटनाला आला होता. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक होते. यातील बहुतेक लोक काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले. पोहता-पोहता शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र देशमुख (वय ५६) खोलवर पाण्यात खेचले गेले. त्यांना जीवरक्षकाने तातडीने पाण्याबाहेर काढले. त्यानंतर बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.