• Sat. Sep 21st, 2024

चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

चार जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत कंठस्नान, निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षा दलांना मोठे यश

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. माओवाद्यांच्या तेलंगण राज्य समितीचे सदस्य असलेले हे चौघे दोन वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर होते. मंगलू, वर्गीस, कुरसम राजू आणि व्यंकटेश अशी त्यांची नावे आहेत. मंगलू आणि वर्गीस या दोघांवर प्रत्येकी १६ लाखांचे, तर कुरसम राजू आणि व्यंकटेश यांच्यावर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते.

गडचिरोली जिल्ह्यात रेपनपल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोलामार्क अभयारण्य परिसरात हे माओवादी लपल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पो. अधीक्षक यतीश देशमुख आणि प्राणहिता पो. उपमुख्यालयाचे अतिरिक्त अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३५० जवान परिसरात दाखल झाले. सोमवारी रात्रीपासून त्यांनी माओवाद्यांना घेरण्यास सुरुवात केली.
खानगाव ग्रामपंचायतीची महिला सचिव लाच घेताना अटकेत, १२ हजार स्वीकारताना ACBने रंगेहाथ पकडलं
कमलापूरजवळील मुद्दमोडगूच्या जंगलात मंगळवारी सकाळी माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. सुमारे एक तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यात चारही माओवादी ठार झाले. त्यांचे उर्वरित साथीदार पळून गेले. पोलिसांनी एके-४७ कार्बाइनसह दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे, स्फोटके आदी साहित्य जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed