• Sat. Sep 21st, 2024

नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीही आग्रही, स्थानिक नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादीही आग्रही, स्थानिक नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक लोकसभा मतदारसंघावर तिसऱ्यांदा विजय मिळविण्याच्या तयारीला लागलेले खासदार हेमंत गोडसे यांच्यापुढील आव्हानांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. येथे आमचा खासदार असल्याने हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा असा दावा शिवसेना शिंदे गटाने केला. भाजपनेही ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, सरचिटणीस अर्जुन टिळे, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे आदींनी मंगळवारी (दि.१९) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित तटकरे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यात दिंडोरी मतदारसंघातील चार, तर नाशिक मतदारसंघातील दोघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतर्फे माधवराव पाटील, वसंतराव पवार, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा आपल्यालाच मिळावी, असा आग्रह या नेत्यांनी अजित पवारांकडे धरला.
नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ
‘जागा मागून घ्या’

महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मागून घ्यावा, अशी भूमिका नाशिकच्या नेत्यांनी मांडली. अजित पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. मतदारसंघात महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संघटनात्मक बांधणी व ताकद उत्तम आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडतो याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed