• Sat. Sep 21st, 2024
शाहू महाराज सगळ्यांनाच हवेत, मविआतून लढण्यावर एकमत, संभाजीराजेंनी रणनीती सांगितली!

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी गेले काही दिवस चर्चा होती. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालेले आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना उमेदवार म्हणून शाहू महाराजच हवेत. त्यामुळे शाहू महाराजांचा मविआतून लढण्याचा निर्णय झालाय. आमचे घराणे कष्टाच्या बाबतीत मागे पडत नाही. त्यांना निवडून आणण्यासाठी एक हजार टक्के प्रयत्न करू, अशी डरकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी फोडली.महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूर लोकसभा जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसनेही दावा केला आहे. शाहू महाराज मविआकडून लढतील, अशी चर्चा होती. मात्र अधिकृतरित्या त्याची घोषणा झालेली नव्हती. अखेर आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराजांच्या उमेदवारीचं ‘ओपन सिक्रेट’ फोडलं. तसेच निवडणूक काळातील रणनीती कशी असेल, याचीही माहिती दिली.
कोल्हापूर काँग्रेसकडे, सांगली ठाकरेंकडे? लोकसभेचा मविआचा तिढा सुटला,शेवटच्या क्षणी जागा नेमकी कुणाकडे जाणार?

संभाजीराजे म्हणाले, “लोकसभेला उतरण्याचं माझं निश्चित होतं, कोल्हापूर नाशिकची चर्चाही सुरू होती पण ज्यावेळी आमच्या बाबांचं (शाहू महाराज) कोल्हापूरची निवडणूक लढविण्याचं ठरलं, त्यावेळी त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं मी सांगितलं. त्यांनी निवडणूक लढावी असा लोकांचा आग्रह होता तसेच त्यांचीही इच्छा होती. माझे वडील, मोठे महाराज माझ्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलंय, मी जर निवडणूक लढवली असती तर आपण विजयासाठी १०० टक्के प्रयत्न केले असते. पण आज महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विजयासाठी १००० हजार टक्के प्रयत्न करू. शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा अनुभव कोल्हापूरला नेहमी पुरोगामी दिशा दाखवेल, यात शंका नाही”.
सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, पाहा यादी!

शाहू महाराज काँग्रेस, शिवसेना की राष्ट्रवादी पक्षाकडून लढणार हा कळीचा प्रश्न संभाजीराजेंना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे मी कसं सांगू, त्यांची भूमिका मी कशी मांडणार…? असा प्रश्न विचारीत महाविकास आघाडीतील सगळ्या पक्षांना महाराजच पाहिजेत, असं वातावरण आहे. जो काही निर्णय महाराज घेतील, त्यांच्यासोबत मी स्वत: असणार आहे, शेवटपर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ, अशी ग्वाही संभाजीराजेंनी दिली.

धन्यवाद देवेंद्र जी, अशाच चुका लक्षात आणून द्या; अजितदादांनी दिलगीरी व्यक्त केली

निवडणुकीकरिता वेळ कमी आहे, रणनीती कशी असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “निवडणुकीसाठी काहीच अडचण येणार नाही. वेळोवेळी मोठ्या महाराजांचा सगळ्यांशी संपर्क आहे. माझा आणि मालोजीराजेंचा देखील संपर्क आहे. पण एकदा ठरलं की निवडणुकीपर्यंत सगळं काही व्यवस्थित होईल. कष्ट करण्यामध्ये आम्ही कुणीही मागे पडणार नाही, मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, अगदी घरदाराचं तोंडही मी पाहत नाही. महाराष्ट्रात फिरतोय, लोकांशी संवाद साधतोय. निवडणूक काळातही तेच करू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed